भाजपाला काय राजकीय फायदा होऊ शकतो ?

नवी दिल्ली, ९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : भारत सरकारने सतरा दिवसांत पाच जणांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. ज्या पाच जणांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे त्यातील चार जणांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. या घोषणांचा भाजपाला काय राजकीय फायदा होऊ शकतो यावरून चर्चेला उधाण आले आहे. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, माजी पंतप्रधान नरसिंह […]

भाजपाला काय राजकीय फायदा होऊ शकतो ?

नवी दिल्ली, ९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : भारत सरकारने सतरा दिवसांत पाच जणांना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला. ज्या पाच जणांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे त्यातील चार जणांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. या घोषणांचा भाजपाला काय राजकीय फायदा होऊ शकतो यावरून चर्चेला उधाण आले आहे.

माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, माजी पंतप्रधान नरसिंह राव आणि हरितक्रांतीचे जनक एम. एस. स्वामीनाथन यांना ९ फेब्रुवारी रोजी भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. चौधरी चरण सिंह हे जुलै १९७९ ते जानेवारी १९८० या कालावधीत पंतप्रधान होते. त्याआधी ते एप्रिल १९६७ ते फेब्रुवारी १९६८ आणि फेब्रुवारी १९७० ते ऑक्टोबर १९७० या कालावधीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. शेतकरी नेते आणि आणीबाणीचे विरोधक अशी त्यांची ओळख होती. यामुळे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना जाहीर झालेल्या भारतरत्न पुरस्काराचा उत्तर प्रदेशच्या शेतकरी पट्ट्यात भाजपाला राजकीय फायदा होऊ शकतो, अशी चर्चा आहे.

नरसिंह राव जून १९९१ ते मे १९९६ या कालावधीत पंतप्रधान होते. देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचं श्रेय त्यांना जातं. त्यांनी आर्थिक उदारीकरणाची भूमिका घेतली. त्यामुळे भारतीय बाजारपेठ खुली झाली. याचा फायदा देशाला झाला. नरसिंह राव यांचा जन्म तेव्हाच्या हैदराबाद जिल्ह्यात झाला. आता हा भाग तेलंगणात आहे. यामुळे जी पंतप्रधान नरसिंह राव यांना जाहीर झालेल्या भारतरत्न पुरस्काराचा दक्षिण भारतात भाजपाला राजकीय फायदा होऊ शकतो, अशी चर्चा आहे.

हरितक्रांतीचे जनक एम. एस. स्वामीनाथन यांचा जन्म तेव्हाच्या मद्रासमध्ये (चेन्नई) झाला होता. त्यांच्या कार्यामुळे भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यास मदत झाली होती. एम. एस. स्वामीनाथन यांना जाहीर झालेल्या भारतरत्न पुरस्काराचा दक्षिण भारतात भाजपाला राजकीय फायदा होऊ शकतो, अशी चर्चा आहे.

प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी झाली आणि ३ फेब्रुवारी रोजी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. पाचवेळा लोकसभेचे आणि चारवेळा राज्यसभेचे खासदार राहिलेल्या अडवाणींनी राम मंदिरासाठी रथयात्रा काढली होती. अडवाणी २००२ ते २००४ या कालावधीत देशाचे उपपंतप्रधान आणि गृहमंत्री होते. भाजपा समर्थकांमध्ये अडवाणींविषयी आदर असलेल्यांची संख्या मोठी आहे. यामुळे अडवाणींना जाहीर झालेल्या भारतरत्न पुरस्काराचा भाजपाला राजकीय फायदा होऊ शकतो, अशी चर्चा आहे.

कर्पुरी सिंह ठाकूर यांना २३ जानेवारी रोजी भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. यानंतर संयुक्त जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी महागठबंधन सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मुख्यमंत्रिदाचा राजीनामा दिला. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्यानं पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. कर्पुरी ठाकूर यांचे पुत्र रामनाथ ठाकूर संयुक्त जनता दलाचे राज्यसभेचे खासदार आहेत. कर्पुरी सिंह ठाकूर यांनी अती मागास असलेल्या समाजाच्या भल्यासाठी आरक्षणाची व्यवस्था केली होती. यामुळे कर्पुरी ठाकूर यांना जाहीर झालेल्या भारतरत्न पुरस्काराचा भाजपाला बिहारमध्ये राजकीय फायदा होऊ शकतो, अशी चर्चा आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number