रवींद्र वायकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

मुंबई, ०८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी कौटुंबीक संबंध असलेले नेते आणि आमदार रवींद्र वायकर हे शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडणार आहे. रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाचे आमदार आहेत. रवींद्र […]

रवींद्र वायकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

मुंबई, ०८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी कौटुंबीक संबंध असलेले नेते आणि आमदार रवींद्र वायकर हे शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडणार आहे. रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाचे आमदार आहेत. रवींद्र वायकर हे लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असून सर्व नगरसेवक, शाखा प्रमुख, विभाग प्रमुखांना तयारीत राहण्याचे आदेश दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरीतील कथित घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यांची ईडीची चौकशीही सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आजच ट्विट करुन, रवींद्र वायकर यांना ईडी धमकावत असल्याचं म्हटलं होतं. तसंच रवींद्र वायकर यांना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी दबाव असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं.

गुप्त बैठकीत काय चर्चा झाली?

रवींद्र वायकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काही दिवसांपूर्वी गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. या बैठकीत रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. आम्ही मुळचे शिवसैनिक आहोत, धनुष्यबाणाचे पाईक आहोत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आम्हाला तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायचे आहे, असे वायकरांनी एकनाथ शिंदे यांना सांगितल्याचे समजते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number