पुण्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून सुहास दिवसे यांची नियुक्ती

पुणे , ८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधुमी सुरु आहे. दरम्यान त्याआधी प्रशासनात मोठे बदल होताना दिसत आहेत. अलीकडेच ५८ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या . त्यानंतर आता पुन्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होताना दिसत असून, पुण्याचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी सुहास दिवसे यांची पुणे […]

पुण्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून सुहास दिवसे यांची नियुक्ती

पुणे , ८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधुमी सुरु आहे. दरम्यान त्याआधी प्रशासनात मोठे बदल होताना दिसत आहेत. अलीकडेच ५८ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या . त्यानंतर आता पुन्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होताना दिसत असून, पुण्याचे विद्यमान जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी सुहास दिवसे यांची पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.

सुहास दिवसे हे याआधी क्रीडा आणि युवक सेवा आयुक्तपदी कार्यरत होते. त्या अगोदर दिवसे हे महिला आणि बालकल्याण आयुक्त म्हणून पुण्यात काम पाहत होते. ते २००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. विशेष म्हणजे ते २००५ मध्ये युपीएसएसीच्या नागरी सेवा परीक्षेत देशात प्रथम आले होते. दिवसे यांच्या कारकिर्दीत हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोचे काम मार्गी लागले. तसेच, त्यांच्याच काळात विकास आराखडाही अंतिम टप्प्यात आला. आता डॉ. राजेश देशमुख हे आता सुहास दिवसे यांच्या जागी क्रीडा आणि युवक सेवा आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळतील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number