राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक

नवी दिल्ली, २९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या ५६ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या १५ राज्यांतील ५६ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या जागांसाठी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी मतदान होणार आहे. निकाल त्याच दिवशी जाहीर होईल. राज्यसभेतील १३ राज्यांच्या ५० सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपणार आहे तर […]

राज्यसभेच्या ५६ जागांसाठी निवडणूक

नवी दिल्ली, २९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या ५६ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या १५ राज्यांतील ५६ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या जागांसाठी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी मतदान होणार आहे. निकाल त्याच दिवशी जाहीर होईल. राज्यसभेतील १३ राज्यांच्या ५० सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपणार आहे तर दोन राज्यांतील सहा सदस्यांचा कार्यकाळ ३ एप्रिल रोजी संपणार आहे.

नऊ केंद्रीय मंत्र्यांसह राज्यसभेच्या ६८ सदस्यांचा कार्यकाळ यावर्षी पूर्ण होत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव, आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह ५६ नेत्यांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात पूर्ण होत आहे. राज्यसभेतून निवृत्त होत असलेल्या सदस्यांमध्ये महाराष्ट्रातील सहा सदस्य आहेत. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (भाजपा), केंद्रीय मंत्री नारायण राणे (भाजपा), कुमार केतकर (काँग्रेस), अनिल देसाई (उद्धव गट), व्ही. मुरलीधरन (भाजपा), वंदना चव्हाण (सुप्रिया गट) हे महाराष्ट्रातील सदस्य निवृत्त होणार आहेत.

राज्यसभेच्या ‘या’ १५ राज्यांमधील ५६ जागांसाठी होणार निवडणूक

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, कर्नाटक, उत्तराखंड, छत्तीसगड, ओडिशा, हरयाणा (हरियाणा), हिमाचल प्रदेश

निवडणूक कार्यक्रम

निवडणूक आयोगाकडून जाहीर झालेल्या जागांमध्ये आंध्र प्रदेश (३), बिहार (६), छत्तीसगड (१), गुजरात (४), हरियाणा (१), हिमाचल प्रदेश (१), कर्नाटक (४), मध्य प्रदेश (५), महाराष्ट्र (६), तेलंगणा (३), उत्तर प्रदेश (१०), उत्तराखंड (१), पश्चिम बंगाल (५) ओडिशा (३) आणि राजस्थान (३) या १५ राज्यांमधील ५६ जागांसाठी निवडणूक होणार आहे.

८ फेब्रुवारी २०२४ – निवडणूक अधिसूचना
१५ फेब्रुवारी २०२४ – अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस
१६ फेब्रुवारी २०२४ – अर्जांची छाननी
२० फेब्रुवारी २०२४ – अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस
२७ फेब्रुवारी २०२४ – राज्यसभेच्या ५६ जागांसाठी मतदान होणार
मतदानाची वेळ – सकाळी ९ ते संध्याकाळी ४
२७ फेब्रुवारी २०२४ – संध्याकाळी ४ नंतर मतमोजणी करून निकाल जाहीर केले जाणार
२९ २७ फेब्रुवारी २०२४ – निवडणूक प्रक्रिया संपणार

मतदानासाठी जांभळ्या (Violet) रंगाचे स्केच पेन वापरण्याचे निर्देश
निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक होण्यासाठी पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्याचे निर्देश
कोविड – १९ मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number