मुंबई, २९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची पक्षांतर बंदी कायदा चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी निवड केली. राहुल नार्वेकर यांची समिती पक्षांतर बंदी कायद्याची चिकित्सा करुन आढावा घेईल. मुंबईत महाराष्ट्राच्या विधान भवन येथे आयोजित दोन दिवसीय ८४व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या समारोपाप्रसंगी ओम बिर्ला यांनी ही घोषणा केली. पक्षांतर बंदी कायद्याचा आढावा घेणं ही नियमित प्रक्रिया आहे. याआधी २०१९ मध्ये तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. त्यावेळी राजस्थान विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष सी.पी. जोशी अध्यक्ष होते. मागील समितीने काही प्रमाणात काम केलेले आहे. आता राहुल नार्वेकर यांना जबाबदारी देत असल्याचे बिर्ला म्हणाले. ॲड. राहुल नार्वेकर यांच्या नियुक्तीवर उद्धव गटाच्या आमदार उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, सुषमा स्वराज तसेच सुप्रिया गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. आता संविधानाची आणि लोकशाहीची ताकद दाखवावीच लागेल असे उद्धव ठाकरे म्हणाले.