मुंबई, १८ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : कोरोना संकटाच्या काळात खिचडी घोटाळा केल्याप्रकरणी सूरज चव्हाण याला ईडीने अटक केली आहे. सूरज चव्हाण हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. कोरोना काळात खिचडी निर्मिती, पॅकिंग, वितरण याचे कंत्राट सूरज चव्हाण यांना मिळाले होते. खिचडीच्या कंत्राटाच्या निमित्ताने सूरज चव्हाण यांनी ६.३७ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप ईडीने केला आहे. या प्रकरणात ईडीने गुन्हा दाखल करून सूरज चव्हाण यांना बुधवारी अटक केली. त्यांना गुरुवारी न्यायालयात सादर केले जाणार आहे.