‘अशी होती भाजपाची ऑफर’, शिंदेंचा दावा

सोलापूर, १७ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मला आणि प्रणितीला भाजपाकडून ऑफर आली होती, असा दावा काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांनी केला. ऑफर संदर्भात त्यांनी मोघम माहिती दिली. देशाचे माजी गृहमंत्री भाजपाकडून ऑफर असल्याचे सांगत असल्यामुळे अनेकांचे लक्ष वेधले गेले. राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. पण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुशीलकुमार शिंदे यांना ऑफर दिली नसल्याचे […]

‘अशी होती भाजपाची ऑफर’, शिंदेंचा दावा

सोलापूर, १७ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मला आणि प्रणितीला भाजपाकडून ऑफर आली होती, असा दावा काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांनी केला. ऑफर संदर्भात त्यांनी मोघम माहिती दिली. देशाचे माजी गृहमंत्री भाजपाकडून ऑफर असल्याचे सांगत असल्यामुळे अनेकांचे लक्ष वेधले गेले. राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. पण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुशीलकुमार शिंदे यांना ऑफर दिली नसल्याचे सांगितले आणि चर्चेला पूर्णविराम दिला.

सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांची मुलगी प्रणिती ही काँग्रेसची सोलापूर विधानसभा मतदारसंघाची आमदार आहे.

चंद्रकांत पाटील आणि सुशीलकुमार शिंदेंची भेट

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुशीलकुमार शिंदे यांना ऑफर दिली नसल्याचे सांगितले. बावनकुळे यांच्या वक्तव्याला काही तास होत नाहीत तोच राज्याचे मंत्री आणि भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी संध्याकाळी सुशीलकुमार शिंदेंची भेट घेतली. या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number