मुंबई, १३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : राऊत यांनी चुकीची स्क्रिप्ट देऊन अडचणीत आणलं असावं…. सकाळच्या पत्रकार परिषदेत डोळयांवरची झडप उडाली नसल्याने उद्धव ठाकरे काहीही बोलले, असे भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले. उद्धव असंबद्ध बोलू लागले आहेत, मोदींचा चेहरा बघितल्यावर त्यांचा थरकाप होतो असेही आशिष शेलार म्हणाले.
राजीव गांधी सेतूवर राजीव गांधींचा फोटो लावला कि नाही हे उद्धव ठाकरे विचारणार का ? हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने असलेल्या फ्री वे वर किती ठिकाणी बाळासाहेबांचे किती ठिकाणी फोटो लावले ? असे प्रश्न आशिष शेलार यांनी उद्धव यांना विचारले. विकासकामं होत असल्याचे बघून उद्धव यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे, असेही शेलार म्हणाले.