मुंबई, १३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : आपला सचिन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. क्रिकेटच्या देवाला आमंत्रण मिळालं आहे. अयोध्येत २२ जानेवारी रोजी मंदिरात प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्याचं आमंत्रण सचिनला मिळालं आहे. राम जन्मभूमी न्यासाने सचिनला सोहळ्याचे आमंत्रण दिले आहे. सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी प्रभू रामाच्या मूर्तीची मंदिराच्या गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.