अटल सेतूवर कोणत्या प्रकारच्या वाहनाला किती टोल ?

मुंबई, १२ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : अटलबिहारी वाजपेयी न्हावा – शेवा अटल सेतूचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. हा भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू आहे. या सागरी सेतूमुळे मुंबई आणि पनवेल, नवी मुंबई यांच्यातील अंतर कमी होण्यास मदत होईल. आधी दोन […]

अटल सेतूवर कोणत्या प्रकारच्या वाहनाला किती टोल ?

मुंबई, १२ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : अटलबिहारी वाजपेयी न्हावा – शेवा अटल सेतूचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. हा भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू आहे. या सागरी सेतूमुळे मुंबई आणि पनवेल, नवी मुंबई यांच्यातील अंतर कमी होण्यास मदत होईल. आधी दोन तासांत होणारा प्रवास आता अवघ्या वीस मिनिटांत पूर्ण होणार आहे. यामुळे वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे.

पुलाची एकूण लांबी : २१.८ किमी.
पुलाचा जमिनीवरील भाग : १६.५ किमी.
पुलाचा समुद्रातील भाग : ५.५ किमी.
पुलाच्या निर्मितीचा खर्च : १७ हजार ८४० कोटी रुपये
पुलासाठी वापरलेले स्टील : १ लाख ७७ हजार ९०३ मेट्रिक टन
पुलासाठी वापरलेले सिमेंट : ५ लाख ४ हजार २५३ मेट्रिक टन
वैशिष्ट्य : देशातला सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू

पुलामुळे एकावेळी ५०० रुपयांचं इंधन वाचेल असा दावा आहे. पुलावरुन जाण्यासाठी कारला एका वेळेसाठी २५० रुपये टोल भरावा लागेल. परतीचा प्रवास असेल तर त्या कारकरिता ३७५ रुपये टोल भरावा लागेल.

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली
‘देशाच्या विकासासाठी समुद्राच्या लाटांशी युद्ध’
‘हा विकास म्हणजे भारताच्या नवनिर्माणाचं ध्येय’
‘तेहत्तीस हजार कोटींच्या विकासकामांचं लोकार्पण’
महाराष्ट्र सरकारचं मोदींनी अभिनंदन केलं
‘मोदीच्या गॅरेंटीला सरकार सत्यात आणत आहे’
जपान देशाचेही मोदींनी मानले आभार
‘अटल सेतू देशाच्या युवाशक्तीसाठी मार्गदर्शक ठरणार’
‘देशाच्या रेल्वे सेवेची प्रतिमा बदलणाऱ्या योजना’
‘लवकरच मुंबईला मिळणार पहिली बुलेट ट्रेन’
मोदींचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
‘अनेक दशकं सरकार असूनही काहीही केलं नाही’
‘या नुसत्या योजना नाहीत, तर रोजगाराच्या नव्या संधी
‘आमची निष्ठा सत्तेशी नाही, तर देशाशी आहे’
‘दोन कोटी महिलांना लखपती करण्याती तयारी’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

मुख्यमंत्र्यांकडून मोदींचा विश्वगुरु असा उल्लेख
मुख्यमंत्र्यांकडून मोदींचा देशाचा गौरव असा उल्लेख
‘अटल सेतू हा विजयाकडे नेणारा महामार्ग’
अब की बार ४५ पार – मुख्यमंत्र्यांची घोषणा
मोदींसमोरुन मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर जोरदार निशाणा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

फडणवीसांचं स्वामी विवेकानंदांना अभिवादन
‘आजचा दिवस सगळ्यांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस’
‘मोदींच्या हस्ते भूमीपूजन आणि उद्घाटनही मोदींच्याच हस्ते’
‘केंद्रातील मोदी सरकारच्या सहकार्यामुळेच अटल सेतूची निर्मिती’
‘येत्या ४ वर्षात मुंबई अधिक वेगवान होणार’
‘राज्याची नवी आर्थिक राजधानी म्हणून नवी मुंबईची ओळख होणार’
‘राज्य सरकारच्या पाठिशी मोदी उभे’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

अजित पवारांकडून पंतप्रधानांचा लोकप्रिय पंतप्रधान असा उल्लेख
‘आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण’
‘आज तिसऱ्या मुंबईच्या निर्मितीची सुरुवात’
‘मुंबई महानगराला ग्रामीण भागाशी जोडणारा सेतू’
‘सामान्य माणसाचं जीवन आणि प्रवास वेगवान होणार’
‘देशाला मोदींच्या नेतृत्वाची आवश्यकता’
‘मोदी नेहमीच युवकांच्या संपर्कात’
‘जगात भारताला महाशक्ती बनणे आता सहजशक्य’

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number