‘देवाच्या काठीचा दणका जोरात असतो’

मुंबई, ११ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : ‘देवाच्या काठीचा दणका जोरात असतो’ या शब्दात भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव यांना उपरोधिक टोला लगावला. ट्वीट करून शेलार यांनी उद्धव यांच्यावर कडाडून टीका केली. ‘मुंबईकरांनी करापोटी दिलेले कोट्यवधी रुपये ज्यांनी पंचवीस वर्षे लुटले आणि बंगले बांधले. मुंबईकरांचे भूखंड गिळले, मराठी माणसाला मुंबई बाहेर फेकले, नाल्यातील गाळात, […]

‘देवाच्या काठीचा दणका जोरात असतो’

मुंबई, ११ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : ‘देवाच्या काठीचा दणका जोरात असतो’ या शब्दात भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव यांना उपरोधिक टोला लगावला. ट्वीट करून शेलार यांनी उद्धव यांच्यावर कडाडून टीका केली.

‘मुंबईकरांनी करापोटी दिलेले कोट्यवधी रुपये ज्यांनी पंचवीस वर्षे लुटले आणि बंगले बांधले. मुंबईकरांचे भूखंड गिळले, मराठी माणसाला मुंबई बाहेर फेकले, नाल्यातील गाळात, रस्त्यावरच्या डांबरात, शाळेतील गरिब मुलांच्या साहित्यात सुध्दा कटकमिशन खाल्ले. कोविडमध्ये मुंबईकर उपचाराविना तडफडत असताना ज्यांनी आपली घरे भरली. मेट्रो, कोस्टलरोड, बुलेट ट्रेन असे मुंबईकरांचे विकास प्रकल्प स्वार्थासाठी अहंकाराने अडवून ठेवले. मुंबईतील मराठी माणसाला, प्रामाणिक करदात्यांना, गरीबांना, कष्टकऱ्यांना, श्रमिक, झोपडपट्टीधारकांना फसवून, लूटून कंत्राटदारांना, बिल्डरांना मालामाल केले. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी ज्यांनी देव, देश आणि धर्माला सोडचिठ्ठी दिली. हिंदूच्या सणांवर बंदी आणली, देवांना बंदिवान केले, राम मंदिर, राम वर्गणीची खिल्ली उडवली. शेवटी सगळ्याचा “निकाल” लागलाच! देवाच्या काठीचा आवाज नसतो पण दणका जोरात असतो!! जय श्रीराम!!’ या शब्दात आशिष शेलार यांनी उद्धव यांना उपरोधिक टोला लगावला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number