…तर हेमंत सोरेन यांची पत्नी होणार मुख्यमंत्री

रांची, २ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : झारखंडमधील जमीन घोटाळा प्रकरणी ईडीचा तपास सुरू आहे. या प्रकरणात ईडीने अटक केली तर काय करायचे याचा विचार झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केला आहे. हेमंत सोरेन यांना अटक झाली तर त्यांची पत्नी कल्पना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बुधवार ३ जानेवारी २०२४ रोजी […]

…तर हेमंत सोरेन यांची पत्नी होणार मुख्यमंत्री

रांची, २ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : झारखंडमधील जमीन घोटाळा प्रकरणी ईडीचा तपास सुरू आहे. या प्रकरणात ईडीने अटक केली तर काय करायचे याचा विचार झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केला आहे. हेमंत सोरेन यांना अटक झाली तर त्यांची पत्नी कल्पना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बुधवार ३ जानेवारी २०२४ रोजी झारखंड मुक्ती मोर्चाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीची घोषणा झाल्यापासून कल्पना सोरेन यांच्या विषयीच्या चर्चेला उधाण आले आहे.

ईडीचे समन्स

ईडीने जमीन घोटाळा प्रकरणी हेमंत सोरेन यांना सहा वेळा समन्स बजावले. यावेळी ईडीने सोरेन यांना कठोर शब्दात समन्स बजावले आहे. चौकशीसाठी कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी आणि कोणत्या कार्यालयात येणार आहात ते लेखी कळवा; असेही ईडीने बजावले आहे. यामुळे लवकरच हेमंत सोरेन यांना अटक होऊ शकते अशी चर्चा आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number