अक्‍कलकोटमध्ये उभी राहणार स्वामी समर्थांची भव्‍य मूर्ती

अक्कलकोट, २२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थांच्या सेवा कार्यातून अक्कलकोटचा विकास हे माझे ध्येय आहे असे प्रतिपादन अक्कलकोट संस्थान नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी श्री स्वामी समर्थ अनुभूती प्रकल्प सादरीकरणप्रसंगी व्यक्त केले. राजघराण्याच्या राम तलाव या निसर्गरम्य परिसरात ४२ एकरात हा प्रकल्प साकारला जाणार असून या ठिकाणी १०८ फूट उंचीची श्री स्वामी समर्थांची […]

अक्‍कलकोटमध्ये उभी राहणार स्वामी समर्थांची भव्‍य मूर्ती

अक्कलकोट, २२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थांच्या सेवा कार्यातून अक्कलकोटचा विकास हे माझे ध्येय आहे असे प्रतिपादन अक्कलकोट संस्थान नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी श्री स्वामी समर्थ अनुभूती प्रकल्प सादरीकरणप्रसंगी व्यक्त केले. राजघराण्याच्या राम तलाव या निसर्गरम्य परिसरात ४२ एकरात हा प्रकल्प साकारला जाणार असून या ठिकाणी १०८ फूट उंचीची श्री स्वामी समर्थांची मूर्ती स्थापना केली जाणार आहे.

सदर प्रकल्प हा अक्कलकोट राजघराण्याच्या शहराच्या मध्य ठिकाणी असलेली जागा श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी निवडली आहे. सदर जागेची निवड श्री स्वामी महाराजांच्या दुष्टांतामुळे निवडली आहे. तसेच श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी त्यांच्या कमी वयामध्ये एवढा मोठा प्रकल्प साकारला आहे. तसेच या प्रकल्पामधून अक्कलकोट येथील नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचाराची सेवा उपलब्ध करण्यात जाणार आहे. हा प्रकल्प ही अक्कलकोट गावाच्या प्रगतीची सुरूवात आहे. यावेळी अनुभूती या पुस्तकाचे प्रकाशन आणि अक्कलकोट राजघराण्याचा इतिहास या संकेतस्थळाचे उद्घाटन देखील करण्यात आले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number