देशभरात १९ ठिकाणी एनआयएची छापेमारी

अमरावती, १८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: देशभरात १९ ठिकाणी एनआयएची छापेमारी रविवारी रात्रपासून सुरु आहे. महाराष्ट्रातील अमरावतीच्या अचलपूरमध्येही एनआयएचे पथक पोहचले. महाराष्ट्र एटीएसला सोबत घेऊन अचलपूरमध्ये कारवाई सुरु केली. या कारवाईत काही जणांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई सोमवारी सकाळीसुद्धा सुरु होती. यावेळी या गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील गावा गावापर्यंत पोहचलेले इसिस मॉड्यूल […]

देशभरात १९ ठिकाणी एनआयएची छापेमारी

अमरावती, १८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: देशभरात १९ ठिकाणी एनआयएची छापेमारी रविवारी रात्रपासून सुरु आहे. महाराष्ट्रातील अमरावतीच्या अचलपूरमध्येही एनआयएचे पथक पोहचले. महाराष्ट्र एटीएसला सोबत घेऊन अचलपूरमध्ये कारवाई सुरु केली. या कारवाईत काही जणांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई सोमवारी सकाळीसुद्धा सुरु होती. यावेळी या गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील गावा गावापर्यंत पोहचलेले इसिस मॉड्यूल उद्ध्वस्त करण्याचा एनआयएचा प्रयत्न आहे. यामुळे राज्यात दोन आठवड्यापासून धडक कारवाया सुरु आहेत.

अचलपूरमधील काही तरुण सिरियातील इसिसच्या संपर्कात आले. त्यांना सिरियामधील हँडलकडून संदेश मिळू लागले. इसिस या दहशतवादी संघटनाच्या संपर्कात अचलपूरमधील काही तरुण आल्याची माहिती एनआयएला मिळाले. त्यानंतर रविवारी रात्री एनआयएचे पथक अमरावतीमध्ये पोहचले. त्यांनी चौकशी सुरु केली. जिहादी आतंकवाद्यांना मोडीत काढण्यासाठी एनआयएने ऑपरेशन सुरु केले. कर्नाटक, महाराष्ट्र, झारखंड आणि नवी दिल्लीत एनआयएची ही कारवाई सुरु आहे. कर्नाटकमधील ११ ठिकाणी छापेमारी सुरु आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number