‘डोळासणे, वावी ट्रॉमा केअर सेंटर कधी उभारणार ?’

नागपूर, १६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : राज्यात महामार्गांचं विस्तीर्ण जाळं तयार केलं जात आहे. मात्र, महामार्गांवरील अपघातांमधील जखमींचा जीव वाचविण्यासाठी आवश्यक असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी कधी होणार, असा प्रश्न आमदार सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केला. अहमदनगर आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांमधील अपघाती मृत्यूंचं प्रमाण कमी करण्यासाठी ट्रॉमा केअर सेंटर्सची निकडीची गरज असल्याचंही त्यांनी नमूद […]

‘डोळासणे, वावी ट्रॉमा केअर सेंटर कधी उभारणार ?’

नागपूर, १६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : राज्यात महामार्गांचं विस्तीर्ण जाळं तयार केलं जात आहे. मात्र, महामार्गांवरील अपघातांमधील जखमींचा जीव वाचविण्यासाठी आवश्यक असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी कधी होणार, असा प्रश्न आमदार सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केला. अहमदनगर आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांमधील अपघाती मृत्यूंचं प्रमाण कमी करण्यासाठी ट्रॉमा केअर सेंटर्सची निकडीची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं. आमदार तांबे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांची राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दखल घेतली. डोळासणे आणि वावी ट्रॉमा केअर सेंटर संदर्भात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सोमवारी तातडीची बैठक बोलावली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number