बापरे ! किंग खानबद्दल मुलीलाच माहिती नाही ‘ही’ गोष्ट ?

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख हा सध्या वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. दरम्यान, शाहरुखची लाडकी लेक सुहाना खान देखील लाईमलाईटमध्ये आली आहे. सुहानाचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला असून त्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती कौन बनेगा करोडपती नावाच्या शो मध्ये गेली होती. त्यामध्ये तिला विचारल्या गेलेल्या प्रश्नावरील तिच्या उत्तराने सर्वचजण चक्रावले. सुहाना ही नेहमीच तिच्या बोल्ड फोटोंसाठी चर्चेत असते. […]

बापरे ! किंग खानबद्दल मुलीलाच माहिती नाही ‘ही’ गोष्ट ?

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख हा सध्या वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. दरम्यान, शाहरुखची लाडकी लेक सुहाना खान देखील लाईमलाईटमध्ये आली आहे. सुहानाचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला असून त्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती कौन बनेगा करोडपती नावाच्या शो मध्ये गेली होती. त्यामध्ये तिला विचारल्या गेलेल्या प्रश्नावरील तिच्या उत्तराने सर्वचजण चक्रावले.

सुहाना ही नेहमीच तिच्या बोल्ड फोटोंसाठी चर्चेत असते. तिच्या फोटोंवर मिळणाऱ्या प्रतिक्रियाही भन्नाट असतात. नुकताच सुहानाचा पहिला चित्रपट ‘द आर्चीज’ प्रदर्शित झाला आहे. त्याची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. सुहानाच्या अनेक रील्सदेखील व्हायरल होत असून ती सध्या चर्चेत आहे. द आर्चीजच्या निमित्तानं ती अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपती नावाच्या शो मध्ये गेली होती. हा खेळ खेळून २५ लाखांची रक्कम जिंकली आहे. परंतु यावेळी अमिताभ यांनी तिला विचारलेला तो प्रश्न सुहानासाठी डोकेदुखी ठरला आहे. त्याचाच व्हिडिओ समोर आला आहे.

सुहानासाठी डोकेदुखी ठरलेला ‘तो’ प्रश्न काय होता ?

अमिताभ यांनी सुहानाला तिच्या वडिलांवरुन प्रश्न विचारला. परंतु त्या प्रश्नाचं उत्तर सुहानाला देता आलं नाही. त्यामुळे ती सध्या ट्रोल होत आहे.

प्रश्न असा होता की,
यापैकी कोणत्या पुरस्कारानं शाहरुखला गौरविण्यात आलेलं नाही.
त्याला पर्याय होते – १. पद्मश्री, २. लिजन ऑफ ऑनर, ३. एल इटिओल डी, ४. वॉल्पी कप
यावर सुहानानं कुठलाही विचार न करता थेट पद्मश्री हे उत्तर सांगून टाकलं. ते उत्तर ऐकल्यानंतर अमिताभ यांनी सुहानाची थट्टा उडवली. ते म्हणाले मुलीलाच माहिती नाही की, वडिलांना कोणते पुरस्कार मिळाले आहेत ते… वास्तविक त्या प्रश्नाचं उत्तर वॉल्पी कप असं आहे. वडिलांबद्दल विचारलेल्या प्रश्नाचंच उत्तर मुलीला देता आलं नाही. त्यामुळे किंग खानची मुलगी सुहाना खान आता ट्रोल होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number