‘मलिक महायुतीत नको’

नागपूर, ७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : सत्ता येते आणि जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. नवाब मलिकांवर ज्या पद्धतीचे आरोप आहेत ते पाहता त्यांना महायुतीत घेणे योग्य नाही, असे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पाठवलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. माजी मंत्री नवाब मलिक हे गुरुवारी […]

‘मलिक महायुतीत नको’

नागपूर, ७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : सत्ता येते आणि जाते, पण सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे. नवाब मलिकांवर ज्या पद्धतीचे आरोप आहेत ते पाहता त्यांना महायुतीत घेणे योग्य नाही, असे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पाठवलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे.

माजी मंत्री नवाब मलिक हे गुरुवारी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात सत्ताधाऱ्यांच्या बाकावर जाऊन बसले होते. यातून त्यांचा पाठिंबा अजित पवार गटाला असल्याचे स्पष्ट झाले. पण याच मुद्यावरून विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारले. यानंतर फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून नवाब मलिकांना महायुतीत सहभागी न करण्याची विनंती केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number