सुनेत्रा पवार भावी खासदार

मुंबई, ४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : ‘सुनेत्रा पवार भावी खासदार’ अशी ओळ छापलेले सुनेत्रा पवार यांचे छायाचित्र असलेले बॅनर मंत्रालयासमोर लावण्यात आले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे बॅनर लावण्यात आले आहेत. मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका प्रतीक्षा घुगे यांच्या वतीने हे बॅनर लावण्यात आले आहेत. यामुळे लोकसभेसाठी […]

सुनेत्रा पवार भावी खासदार

मुंबई, ४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : ‘सुनेत्रा पवार भावी खासदार’ अशी ओळ छापलेले सुनेत्रा पवार यांचे छायाचित्र असलेले बॅनर मंत्रालयासमोर लावण्यात आले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे बॅनर लावण्यात आले आहेत. मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका प्रतीक्षा घुगे यांच्या वतीने हे बॅनर लावण्यात आले आहेत. यामुळे लोकसभेसाठी २०२४ मध्ये होणार असलेल्या निवडणुकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार उभ्या राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याआधी लोकसभेसाठी २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर मावळ मतदारसंघातून पार्थ पवार उभे राहिले होते. पण पार्थ यांचा पराभव झाला होता. या पराभवानंतर पार्थ पवार विधानसभेची निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. प्रत्यक्षात पार्थ पवार २०१९ च्या पराभवानंतर निवडणुकीच्या रिंगणापासून लांब आहेत. आता लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा होण्याआधीच सुनेत्रा पवार यांच्या नावाचे बॅनर लागले आहेत. यामुळे राष्ट्रवादीकडून २०२४च्या लोकसभेसाठी अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number