‘अजित पवारांच्या तोंडी भाजपाची स्क्रिप्ट’

मुंबई, ०२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी कर्जतमध्ये बोलताना राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेबाबत मोठे गौप्यस्फोट केले आहे. यावर उद्धव गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार बोलताय ती भाजपची स्क्रिप्ट आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना ठरविण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. खोटे आरोप […]

‘अजित पवारांच्या तोंडी भाजपाची स्क्रिप्ट’

मुंबई, ०२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी कर्जतमध्ये बोलताना राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेबाबत मोठे गौप्यस्फोट केले आहे. यावर उद्धव गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार बोलताय ती भाजपची स्क्रिप्ट आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना ठरविण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. खोटे आरोप अल कायदा टेरेर्स काम करत होती तसे भाजप करत आहे, असे टिकास्त्र संजय राऊत यांनी केले आहे.

राऊतांचा भाजपवर घणाघात
भाजपने पक्ष आणि घर फोडली आहेत. आता नेते तुटत नाहीत. म्हणून चारित्र्यावर हल्ला केला जातोय. अजित पवार आणि शिंदे गटाने त्यांचा मार्ग निवडला. त्यांनी तसं जावं. सध्या अजित पवार नाही बोलत नाहीत. तर भाजप बोलतंय. शिवसेना आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रच्या अस्मितेसाठी काम करणारे पक्ष आहेत. या पक्षांना भाजप संपवू पाहात आहे. पण तसं होणार नाही. राज्यातील जनता आमच्यासोबत आहे. भविष्यात महाराष्ट्रात आणि देशात आमचं सरकार येईल, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.

बारामतीसह अन्य ठिकाणी लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा काल अजित पवार यांनी केली. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ती अजित पवार यांची भूमिका आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना संपवण्याण्यासाठी भाजपकडून षड्यंत्र रचलं जात आहे. संघाचं हे कारस्थान आणि कपट आहे, असं म्हणत राऊतांनी निशाणा साधला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number