‘शरद पवारांनीच भाजपासोबत जाण्याचा सल्ला दिला’

कर्जत, २ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : ‘शरद पवारांनीच भाजपासोबत जाण्याचा सल्ला दिला, असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांनी केला. मी राष्ट्रवादीच्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देतो. तू भाजपासोबत जा, असे त्यांनी सांगितल्याने आम्ही भाजपासोबत सत्तेत गेलो, असे अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसांचे शिबिर रायगड जिल्ह्यातील कर्जत […]

‘शरद पवारांनीच भाजपासोबत जाण्याचा सल्ला दिला’

कर्जत, २ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : ‘शरद पवारांनीच भाजपासोबत जाण्याचा सल्ला दिला, असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांनी केला. मी राष्ट्रवादीच्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देतो. तू भाजपासोबत जा, असे त्यांनी सांगितल्याने आम्ही भाजपासोबत सत्तेत गेलो, असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसांचे शिबिर रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे झाले. या शिबिरात बोलताना अजित पवार यांनी गौप्यस्फोट केला. आधी राजीनामा देतो म्हणून सांगितले आणि पुन्हा राजीनामा मागे घेण्यासाठी आंदोलन करायलाही लावले. आम्हाला असेच सतत गाफील ठेवले गेले, असेही अजित पवार म्हणाले.

‘मी बत्तीस वर्षांपासून मंत्री म्हणून काम करत आहे. त्यामुळे मला कामाचा चांगला अनुभव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माझ्या अध्यक्षतेखाली काम करत आहे’, अशी सुरुवात करत अजित पवारांनी मग शरद पवारांनी घडवलेल्या राजीनामानाट्यामागचे सत्य सांगितले. ‘शरद पवारांनीच मी राजीनामा देतो, तू अध्यक्ष हो’, असे सांगितले. भाजपासोबत जाण्याचा सल्लाही त्यांनीच दिला. त्यानुसारच आम्ही सत्तेत गेलो; असे अजित पवार म्हणाले. सुप्रिया सुळे यांना संपूर्ण निर्णयप्रक्रियेची कल्पना होती. आधी शरद पवार यांनी भाजपासोबत जाण्याचा सल्ला दिला आणि नंतर प्रकरण न्यायालयात नेले. पण न्यायालयातील लढाई आम्हीच जिंकू, असेही अजित पवार म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number