नवी दिल्ली, ३० नोव्हेंबर २०२३ : मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभांसाठी मतदान पार पडले. मतमोजणी रविवार ३ डिसेंबर २०२३ रोजी होणार आहे. पाच राज्यांमध्ये सत्ताधारी पुन्हा विजयी होणार की विरोधक सत्तेत येणार याचा अंदाज घेण्यासाठी वेगवेगळ्या खासगी संस्थांनी एक्झिट पोल घेतले आहेत. एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भाजपा तर तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. मिझोराममध्ये सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट काँग्रेस आणि झोरम पीपल्स मूव्हमेंट यांच्यात चुरस होण्याची शक्यता अनेक एक्झिट पोल व्यक्त करत आहेत.
महत्त्वाचे मुद्दे
पाच राज्यांच्या विधानसभांसाठी झाले मतदान
एक्झिट पोल जाहीर
मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष
तेलंगणा, छत्तीसगडमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष
मिझोरममध्ये चुरशीचे वातावरण
सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट काँग्रेस आणि झोरम पीपल्स मूव्हमेंटमध्ये चुरस
मध्य प्रदेश एक्झिट पोल
चाणक्य – भाजपा १५१, काँग्रेस ७४, इतर ५
मॅट्रिझ – भाजपा ११८ – १३०, काँग्रेस ९७ – १०७, इतर ० – २
पोलस्टार्ट – भाजपा १०० – ११०, काँग्रेस ९० – १००, इतर ५ – १५
अॅक्सिस – भाजपा १०६ – ११६, काँग्रेस १११ – १२१, इतर ० – ६
सीएनएक्स – भाजपा ११८ – १३०, काँग्रेस ९७ – १०७, इतर ०
जन की बात – भाजपा ११८ – १३०, काँग्रेस ९७ – १०७, इतर ० – २
राजस्थान एक्झिट पोल
चाणक्य – भाजपा ८९, काँग्रेस १०१, इतर ९
ईटीजी – भाजपा १०८ – १२८, काँग्रेस ५६ – ७२, इतर १३ – २१
पोलस्टार्ट – भाजपा १०५, काँग्रेस ९२, इतर २
अॅक्सिस – भाजपा ९०, काँग्रेस ९५, इतर १४
जन की बात – भाजपा १०० – १२२, काँग्रेस ६२ – ८५, इतर १४ – १५
मॅट्रिझ – भाजपा १११, काँग्रेस ७४, इतर ११
छत्तीसगड एक्झिट पोल
सीएनएक्स – भाजपा ३० – ४०, काँग्रेस ४६ – ५६, इतर ३ – ५
पोलस्टार्ट – भाजपा ३५ – ४५, काँग्रेस ४० – ५०, इतर ० – ३
अॅक्सिस – भाजपा ३६ – ४६, काँग्रेस ४० – ५०, इतर १ – ५
मॅट्रिझ – भाजपा ४१, काँग्रेस ४६, इतर ३
चाणक्य – भाजपा ३३, काँग्रेस ५७, इतर ०
ईटीजी – भाजपा ३२ – ४०, काँग्रेस ४८ – ५६, इतर २ – ४
तेलंगणा एक्झिट पोल
चाणक्य – बीआरएस ३३, भाजपा ७, काँग्रेस ७१, इतर ८, एमआयएम ०
ईटीजी – बीआरएस ३७ – ४५, भाजपा ६ – ८, काँग्रेस ६० – ७०, इतर ०, एमआयएम ५ -७
पोलस्टार्ट – बीआरएस ४८ – ५८, भाजपा ५ – १०, काँग्रेस ४९ – ५९, इतर ६ – ८, एमआयएम ०
जन की बात – बीआरएस ४० – ५५, भाजपा ७ – १३, काँग्रेस ४८ – ६४, इतर ०, एमआयएम ४ -७
सीएनएक्स – बीआरएस ३१ – ४७, भाजपा २ -४, काँग्रेस ६३ – ७९, इतर ०, एमआयएम – ५ – ६
मिझोराम एक्झिट पोल
सी व्होटर – काँग्रेस २ – ८, एमएनएफ १५ – २१, झेडपीएम १२ – १८, इतर ० – ५, भाजपा ०
जन की बात – काँग्रेस ५ – ९, एमएनएफ १० – १४, झेडपीएम १५ – २५, इतर ०, भाजपा ० – २
सीएनएक्स – काँग्रेस ८ – १०, एमएनएफ १४ – १८, झेडपीएम १२ -१६, इतर ०, भाजपा ० – २
ईटीजी – काँग्रेस ९ – १३, एमएनएफ १४ – १८, झेडपीएम १० -१४, इतर ०, भाजपा ० – २
मॅट्रिक्झ – काँग्रेस ७ – १०, एमएनएफ १७ – २२, झेडपीएम ७ – १२, इतर ० – १, भाजपा १ – २