राष्ट्रपतींचा शनिदेवाला तैलाभिषेक

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कन्या इतिश्री मुर्मू हिच्या सोबत गुरुवारी शनिशिंगणापूर येथे शनैश्वराचे दर्शन घेतले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ आणि शनैश्वर देवस्थानाच्या वतीने राष्ट्रपती मुर्मू यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ,त्यांची कन्या इतिश्री आणि राज्यपाल रमेश बैस, यांनी शनिदेवाचा तैलाभिषेक […]

राष्ट्रपतींचा शनिदेवाला तैलाभिषेक

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कन्या इतिश्री मुर्मू हिच्या सोबत गुरुवारी शनिशिंगणापूर येथे शनैश्वराचे दर्शन घेतले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ आणि शनैश्वर देवस्थानाच्या वतीने राष्ट्रपती मुर्मू यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ,त्यांची कन्या इतिश्री आणि राज्यपाल रमेश बैस, यांनी शनिदेवाचा तैलाभिषेक आणि संकल्प पूजा करून शनैश्वराचरणी देशाच्या सुख शांतीची प्रार्थना केली. शनी दर्शनानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी, शनैश्वर देवस्थान प्रसादलयात वरण भात, भेंडीची भाजी, शिरा, चपाती, मटकी व करडईच्या भाजीचा प्रसाद ग्रहण केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number