सिंधुदुर्गात नौसेना दिनाची जय्यत तयारी

सिंधुदुर्ग, २८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : पाकिस्तानच्या लष्करी कारवायांना चोख उत्तर देण्यासाठी भारताने ४ डिसेंबर १९७१ रोजी कराची बंदरावर हल्ला केला होता. या घटनेची आठवण म्हणून भारतीय नौदल दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौसेना दिन साजरा करते. यंदा भारतीय नौसेना दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवार ४ डिसेंबर २०२३ रोजी साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी सिंधुदुर्ग किल्ला आणि […]

सिंधुदुर्गात नौसेना दिनाची जय्यत तयारी

सिंधुदुर्ग, २८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : पाकिस्तानच्या लष्करी कारवायांना चोख उत्तर देण्यासाठी भारताने ४ डिसेंबर १९७१ रोजी कराची बंदरावर हल्ला केला होता. या घटनेची आठवण म्हणून भारतीय नौदल दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौसेना दिन साजरा करते. यंदा भारतीय नौसेना दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवार ४ डिसेंबर २०२३ रोजी साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी सिंधुदुर्ग किल्ला आणि राजकोट किल्ल्यावर जय्यत तयारी सुरू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

भारतात सर्वात आधी आरमाराची अर्थात नौदलाची स्थापना शिवाजी महाराजांनी केली होती. या कामगिरीची आठवण म्हणून शिवरायांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर आणि राजकोट किल्ल्यावर नौदल दिन साजरा होणार आहे.

नौसेनेची प्रात्यक्षिके जगभरातील पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर होणार आहेत. नौदल दिनासाठी येणाऱ्या व्हीआयपींच्या सोयीसाठी सिंधुदुर्गात सात ठिकाणी हेलिपॅड उभारण्यात आली आहेत. चिपी विमानतळावर नाईट लँडिंगची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. नौसेना दिनानिमित्त मालवण मधील तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर भव्य व्यासपीठ बनवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number