मुंबई, २० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले नाही हे माहिती अधिकारातून उघड झाले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी लाठीमार करण्याचा आदेश दिला असा आरोप शिंदे सरकारचे विरोधक करत होते. पण माहिती अधिकारातून पुढे आलेल्या माहितीमुळे विरोधकांच्या आरोपात तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आसाराम डोंगरे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत लाठीमार प्रकरणी माहिती मागवली होती. आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आदेश मिळाले नव्हते, अशी माहिती जालन्याचे पोलीस उपअधीक्षक आर. सी. शेख यांनी दिली.