नवी मुंबई मेट्रो शुक्रवारपासून सेवेत

नवी मुंबई, १६ नोव्हेंबर, २०२३, प्रतिनिधी : उद्घाटन न करताच नवी मुंबई मेट्रोचा शुभारंभ होणार आहे. नागरिकांचे हित साधण्यासाठी तसेच नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार सिडकोने नवी मुंबई मेट्रो सेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. अनेक वर्षांपासून नवी मुंबईतील नागरिक मेट्रोची वाट बघत होते. अखेर ही मेट्रो सेवा सुरू होत असल्यामुळे नवी […]

नवी मुंबई मेट्रो शुक्रवारपासून सेवेत

नवी मुंबई, १६ नोव्हेंबर, २०२३, प्रतिनिधी : उद्घाटन न करताच नवी मुंबई मेट्रोचा शुभारंभ होणार आहे. नागरिकांचे हित साधण्यासाठी तसेच नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार सिडकोने नवी मुंबई मेट्रो सेवा सुरू करण्याचे नियोजन केले आहे. अनेक वर्षांपासून नवी मुंबईतील नागरिक मेट्रोची वाट बघत होते. अखेर ही मेट्रो सेवा सुरू होत असल्यामुळे नवी मुंबई शहरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

नवी मुंबई येथील सीबीडी बेलापूर ते पेणधर ही अकरा किमी. ची मेट्रो सेवा शुक्रवार १७ नोव्हेंबर २०२३ पासून सुरू होणार आहे. सीबीडी बेलापूर ते पेणधर हा नवी मुंबई येथील मेट्रो मार्ग क्रमांक एक अर्थात मेट्रो लाईन १ आहे. नवी मुंबई मेट्रो सेवा सुरू झाल्यावर या भागातील नागरिकांचा प्रवास सुलभ होण्यास मदत होईल.

नवी मुंबईत शुक्रवारपासून मेट्रो धावणार
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार उद्घाटनाशिवाय मेट्रो धावणार
बेलापूर ते पेंधार मार्गावर मेट्रो सेवा

तेरा वर्षांपासून हा प्रकल्प राखडला होता… पहिल्या टप्प्यात अकरा स्थानके आहेत… कोणकोणती ते पाहुयात…

१. सी बी डी बेलापूर

२. सेक्टर 7 (सी बी डी बेलापूर)

३. सिडको सायन्स पार्क (खारघर)

४. उत्सव चौक (खारघर)

५. सेक्टर ११ (खारघर)

६. सेक्टर १४ (खारघर)

७. सेंट्रल पार्क (खारघर)

८. पेठपाडा (खारघर)

९. सेक्टर ३४ (खारघर)

१०. पंचानंद

११. पेणधर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number