मुंबई, १० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात सादर करण्यात आलेली प्रतिज्ञापत्रं बनावट असल्याचा दावा सुप्रिया गटाने बुधवारी केला. या दाव्याच्या निमित्ताने जितेंद्र आव्हाड यांनी केलेले ट्वीट वादात सापडले आहे. अजित पवार यांच्या गटाचे अर्थात दादा गटाचे प्रवक्ता सूरज चव्हाण यांनी आव्हाड यांना थेट आव्हान दिले आहे.
‘असत्य आणि अधर्म हे तुमचं ब्रीद वाक्य आहे’ ‘धर्माची भाषा तुमच्या तोंडून शोभून दिसतं नाही’ ‘खोटं बोलावं पण एवढं ?’ ‘वीस हजार प्रतिज्ञापत्रे ही खोटी आहेत हे सिद्ध करा असं माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे’ ‘महाराष्ट्राच्या जनतेची आणि शरद पवार यांची दिशाभूल करणं थांबवा’ या शब्दात ट्वीट करून सूरज चव्हाण यांनी आव्हाड यांना थेट आव्हान दिले आहे.