मंत्री दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला

पुणे, १० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ही भेट दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी असल्याचे बोलले जात आहे. काय झाले बैठकीतदिलीप वळसे पाटील यांनी बैठकीनंतर माध्यमांना माहिती दिली. या बैठकीत कुठली ही राजकीय चर्चा झाली नाही. […]

मंत्री दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला

पुणे, १० नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ही भेट दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी असल्याचे बोलले जात आहे.

काय झाले बैठकीत
दिलीप वळसे पाटील यांनी बैठकीनंतर माध्यमांना माहिती दिली. या बैठकीत कुठली ही राजकीय चर्चा झाली नाही. रयत शिक्षण संस्थेमध्ये होणाऱ्या बदला संदर्भात किंवा माझ्या नावाचा बदल करण्यासंदर्भात काहीच चर्चा झाली नाही. आपण पवार साहेबांचे मार्गदर्शन नेहमी घेत असतो, असे दिलीप वळसे यांनी म्हटले. रयत शिक्षण संस्थेतील अनेक मुख्य पदांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. दिलीप वळसे पाटील हे अजित पवार गटाचे नेते अजूनही रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारिणीत आहे. यामुळे रयत शिक्षण संस्थेची कार्यकारणी बदलण्याची चर्चा होती. परंतु असे काहीच झाले नाही, असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले. शरद पवार यांची पाडवा भेट कधी घेणार, ते अजून ठरलेले नाही, असे त्यांनी म्हटले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number