छत्रपती संभाजीनगर, ८ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी केलेल्या उपोषणामुळे प्रकृती नाजूक झाल्याने सध्या रुग्णालयात असलेले मनोज जरांगे पाटील यांची राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज पुन्हा भेट घेणार आहे. या भेटीत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याबरोबर सरकारकडून लेखी मसुदा त्यांना दिला जाण्याची शक्यता आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला दोन महिन्यांचा अवधी दिला आहे. सरकार आता या समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहे.आज १० वाजता मंनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषदे होणार आहे या परिषदेत ते काय बोलणार हे खुलासा करणारं हे ही पाहावं लागणार आहे.