मुख्यमंत्री शिंदे जम्मू-काश्मिर दौऱ्यावर

काश्मीर, ७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेनजीकच्या ४१ राष्ट्रीय रायफल येथे बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण मंगळवार ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास जम्मू -काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार […]

मुख्यमंत्री शिंदे जम्मू-काश्मिर दौऱ्यावर

काश्मीर, ७ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान सीमेनजीकच्या ४१ राष्ट्रीय रायफल येथे बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण मंगळवार ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास जम्मू -काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

मुंबईच्या राजभवन येथे २० ऑक्टोबर २०२३ रोजी एका समारंभात राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारुढ पुतळ्याचे ढोल ताशांच्या गजरात आणि “जय भवानी जय शिवाजी” च्या जयघोषात स्वागत करण्यात आले. तेथून हा पुतळा कुपवाड्याकडे मार्गस्थ करण्यात आला होता. महाराष्ट्रातून सुरू झालेला हा प्रवास सुमारे २२०० कि.मी. अंतर पार करीत एका आठवड्यात कुपवाडा येथे पोहोचला. रस्त्यातील महत्वाच्या शहरांमधील ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी या पुतळ्याचे पूजन करतानाच स्वागतही करण्यात आले. मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी सकाळी या पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

कुपवाडा येथील भारतीय सैन्याच्या छावणीत या पुतळ्याच्या स्थानाचे भूमिपूजन यंदाच्या पाडव्याच्या दिवशीच करण्यात आले. त्यासाठी शिवनेरी, तोरणा, राजगड, प्रतापगड आणि रायगड या पाच किल्ल्यांवरील माती आणि पाणी आणण्यात आली होती. हा पुतळा साडेदहा फूट उंचीचा असून जमिनीपासून जवळपास तितक्याच उंचीच्या आणि ७ बाय ३ या आकाराच्या चौथऱ्यावर उभारण्यात येणार आहे. याठिकाणी पुतळ्याच्या मागे उंच भगवा ध्वज लावण्यात आला आहे. पुतळ्याच्या समोरच्या दिशेने असलेल्या पर्वंतरांगांच्या पलिकडे पाकिस्तान आहे. अश्वारूढ पुतळ्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे मुख आणि तलवार पाकिस्तानच्या दिशेने असावे अशा पद्धतीने पुतळा बसविण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे १८०० ट्रक माती टाकून भराव करण्यात आला. शिवाय याभागातील हवामान, भूस्खलन याबाबी पाहता पक्के बांधकाम करून पाया तयार करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number