एकनाथ खडसेंना हृदयविकाराचा झटका

जळगाव,५ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. खडसे हे जळगावातील त्यांच्या निवासस्थानी असताना त्यांना हार्ट अटॅकचा झटका आला आहे. खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांनी याबाबतची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली आहे. त्यानंतर एकनाथ खडसे यांना उपचारासाठी एअर अँम्ब्यूलन्सने मुंबईत दाखल करण्यात आलं आहे. एकनाथ […]

एकनाथ खडसेंना हृदयविकाराचा झटका

जळगाव,५ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. खडसे हे जळगावातील त्यांच्या निवासस्थानी असताना त्यांना हार्ट अटॅकचा झटका आला आहे.

खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांनी याबाबतची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली आहे. त्यानंतर एकनाथ खडसे यांना उपचारासाठी एअर अँम्ब्यूलन्सने मुंबईत दाखल करण्यात आलं आहे. एकनाथ खडसे यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार केले जाणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारा दौऱ्यावर असून त्यांनी एकनाथ खडसेंना मुंबईत आणण्यासाठी विशेष एअर अँम्ब्यूलन्सची व्यवस्था करून दिली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे जेष्ठ आमदार एकनाथ खडसे हे एक कार्यक्रम आटोपून जळगावातील निवासस्थानी गेले होते. त्यानंतर रविवारी दुपारी त्यांना अचानक छातीत त्रास व्हायला लागला. यावेळी एकनाथ खडसेंना हृदयविकाराचा झटका आल्याचं समजताच त्यांच्या कुटुंबियांना त्यांना जळगावातील गजानन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्यानंतर प्राथमिक उपचार सुरू असातनाच रोहिणी खडसे यांनी खडसेंना हार्ट अटॅक आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. मुख्यमंत्र्यांनी एकनाथ खडसेंना तातडीने मुंबईत आणण्यासाठी एअर अँम्ब्यूलन्सची व्यवस्था करून दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number