‘समाजाला खरं सांगायला हवं’, संभाजी ब्रिगेडची स्पष्ट भूमिका

मुंबई, ३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : समाजाला खरं सांगायला हवं. आरक्षणासाठीचे कायदे काय आहेत… नव्याने आरक्षण देण्याची प्रक्रिया काय आहे…. हे जनतेला सांगायला हवं. आधी ओबीसी समाजाला किती आरक्षण होते आणि ते कधी वाढवण्यात आले… हा निर्णय कोणी आणि का घेतला… या सर्व बाबी समाजाला सांगायला हव्या, असे संभाजी ब्रिगेडचे शिवानंद भानुसे म्हणाले. ‘जय महाराष्ट्र’ […]

‘समाजाला खरं सांगायला हवं’, संभाजी ब्रिगेडची स्पष्ट भूमिका

मुंबई, ३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : समाजाला खरं सांगायला हवं. आरक्षणासाठीचे कायदे काय आहेत… नव्याने आरक्षण देण्याची प्रक्रिया काय आहे…. हे जनतेला सांगायला हवं. आधी ओबीसी समाजाला किती आरक्षण होते आणि ते कधी वाढवण्यात आले… हा निर्णय कोणी आणि का घेतला… या सर्व बाबी समाजाला सांगायला हव्या, असे संभाजी ब्रिगेडचे शिवानंद भानुसे म्हणाले. ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीच्या ‘लक्षवेधी’ या कार्यक्रमात ‘सरसकट कुणबी म्हणजे सरसकट दिशाभूल’ या मुद्यावर झालेल्या चर्चेत ते सहभागी झाले होते. याआधी गुरुवारी मनोज जरांगे पाटील यांनी नऊ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण फळांचा रस पिऊन सोडले. आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाला २ जानेवारी पर्यंतची मुदत देत असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number