दिल्लीत दहशतवाद्याला अटक

नवी दिल्ली, ३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : पुण्यातून फरार झालेल्या दहशतवाद्याला दिल्लीत अटक करण्यात आली. मोहम्मद शाहनवाज आलम असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. आलम दहशतवाद्यांना शस्त्र चालवण्याचे आणि स्फोटके तयार करण्याचे प्रशिक्षण देत होता. कोथरूड पोलिसांनी जुलै महिन्यात मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी आणि मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान या दोन दहशतवाद्यांना अट केली, […]

दिल्लीत दहशतवाद्याला अटक

नवी दिल्ली, ३ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : पुण्यातून फरार झालेल्या दहशतवाद्याला दिल्लीत अटक करण्यात आली. मोहम्मद शाहनवाज आलम असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. आलम दहशतवाद्यांना शस्त्र चालवण्याचे आणि स्फोटके तयार करण्याचे प्रशिक्षण देत होता. कोथरूड पोलिसांनी जुलै महिन्यात मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी आणि मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान या दोन दहशतवाद्यांना अट केली, त्यावेळी मोहम्मद शाहनवाज आलम फरार झाला होता. अखेर त्याला दिल्लीतून अटक करण्यात आली. दहशतवादी आलम मूळचा झारखंडचा रहिवासी आहे. तो पुण्यात राहून आयसिससाठी नवे दहशतवादी प्रशिक्षित करण्याचे काम करत होता.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number