मराठा समाजाने संयम राखावा

गोंदिया, २५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मराठ्यांना टिकणारे आरक्षण देणार असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. हे आश्वासन मिळाले असूनही मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी नव्याने उपोषण सुरू केले आहे. या संदर्भात बोलताना मराठा समाजाने संयम राखावा आणि धीर धरावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी केले. राज्य शासन मराठ्यांना टिकणारे आरक्षण […]

मराठा समाजाने संयम राखावा

गोंदिया, २५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मराठ्यांना टिकणारे आरक्षण देणार असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. हे आश्वासन मिळाले असूनही मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी नव्याने उपोषण सुरू केले आहे. या संदर्भात बोलताना मराठा समाजाने संयम राखावा आणि धीर धरावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी केले. राज्य शासन मराठ्यांना टिकणारे आरक्षण देण्यासाठीच प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.

रोहित पवार महाराष्ट्रात संघर्ष यात्रा काढत आहेत. या यात्रेच्या निमित्ताने राज्यातील रोहित पवार यांना महाराष्ट्राच्या अडचणी समजतील आणि त्या सोडवण्यासाठी सत्तेत असणे किती महत्त्वाचे आहे याचीही जाणीव होईल, असे प्रफुल पटेल म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number