मुंबई, २५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : सुप्रिया गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे ड्रग्ज माफियांशी लागेबांधे आहेत, असा आरोप शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी केला. आव्हाडांचे ड्रग्ज माफियांशी संबंध असल्याचे सांगत कायंदे यांनी पुरावे सादर केले आहेत. कायंदे यांच्या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
आव्हाडांनी फेटाळले आरोप
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कायंदे यांचे ड्रग्ज माफियांशी संबंधित असल्याचे आरोप फेटाळले. फोटो काढण्यासाठी आलेल्या प्रत्येकाचे चारित्र्य तपासून बघणे शक्य नाही, असेही ते म्हणाले.