निलेश राणेंची राजकीय निवृत्ती

मुंबई, २४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांचे एक ट्वीट व्हायरल होत आहे. या ट्वीटमध्ये निलेश राणे यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केल्याचे दिसत आहे. निलेश राणे पंधराव्या लोकसभेत रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार होते. नंतर सोळाव्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीत निलेश राणेंचा पराभव झाला. विनायक राऊत यांचा विजय झाला. विनायक राऊत […]

निलेश राणेंची राजकीय निवृत्ती

मुंबई, २४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांचे एक ट्वीट व्हायरल होत आहे. या ट्वीटमध्ये निलेश राणे यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केल्याचे दिसत आहे. निलेश राणे पंधराव्या लोकसभेत रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार होते. नंतर सोळाव्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीत निलेश राणेंचा पराभव झाला. विनायक राऊत यांचा विजय झाला. विनायक राऊत उद्धव गटात आहेत. निलेश राणे यांनी पराभवानंतर काही काळाने भाजपात प्रवेश केला. ते २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार असतील अशी शक्यता व्यक्त होत होती. पण व्हायरल होत असलेल्या ट्वीटमुळे लोकसभेसाठी रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघातून निलेश राणेंना उमेदवारी दिली जाणार नसल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

निलेश राणेंचे ट्वीट

‘मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या वीस वर्षामध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. भारतीय जनता पक्षामध्ये खूप प्रेम भेटलं आणि भाजपासारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे.  

मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहे’; अशा स्वरुपाचे ट्वीट निलेश राणे यांनी केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number