‘…तर सरकारला किंमत द्यावी लागेल’

पुणे, २४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : सुप्रिया गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात पुणे ते नागपूर अशी ८०० किमी. ची संघर्ष यात्रा सुरू झाली. या यात्रेला सुरुवात करण्याआधी शरद पवार यांनी युवा कार्यकर्त्यांना पुण्यात मार्गदर्शन केले. सत्ताधाऱ्यांना सत्ता राखायची असेल तर युवा पिढीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. दुर्लक्ष केले तर सरकारला किंमत द्यावी लागेल; असे […]

‘…तर सरकारला किंमत द्यावी लागेल’

पुणे, २४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : सुप्रिया गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात पुणे ते नागपूर अशी ८०० किमी. ची संघर्ष यात्रा सुरू झाली. या यात्रेला सुरुवात करण्याआधी शरद पवार यांनी युवा कार्यकर्त्यांना पुण्यात मार्गदर्शन केले. सत्ताधाऱ्यांना सत्ता राखायची असेल तर युवा पिढीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. दुर्लक्ष केले तर सरकारला किंमत द्यावी लागेल; असे शरद पवार म्हणाले. भाषणात शरद पवार यांनी रोहित पवार यांचे कौतुक केले. याआधी शरद पवार आणि रोहित पवार यांच्यावर युवा कार्यकर्त्यांनी जेसीबीमधून फुलांची उधळण केली. पुण्यातील टिळक स्मारकाजवळ टिळक स्मारक हॉल येथे शरद पवार यांनी युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. युवकांचे प्रश्न जाणून घ्या आणि सरकारपुढे मांडा, या प्रश्नांचा पाठपुरावा करा आणि या प्रश्नांची उकल करण्यासाठी जेव्हा बैठक होईल त्यावेळी आपण उपस्थित राहू असे शरद पवार म्हणाले. मुख्यमंत्र्यांकडून मागण्यांबाबत सकारात्मक उत्तर घेऊ असेही शरद पवार म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number