मणिपूरच्या हिंसेत परकीय शक्तीचा हात ?

नागपूर, २४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मणिपूरच्या हिंसेत परकीय शक्तीचा हात असल्याचा संशय सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केला, रेशीमबाग येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव साजरा झाला. याप्रसंगी संघाच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना सरसंघचालकांनी हा संशय व्यक्त केला. मणिपूरमध्ये झालेल्या हिंसेत परदेशातील दहशतवादी सहभागी असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. तब्बल दहा वर्षांच्या शांततेनंतर मैतेई आणि […]

मणिपूरच्या हिंसेत परकीय शक्तीचा हात ?

नागपूर, २४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मणिपूरच्या हिंसेत परकीय शक्तीचा हात असल्याचा संशय सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केला, रेशीमबाग येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव साजरा झाला. याप्रसंगी संघाच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना सरसंघचालकांनी हा संशय व्यक्त केला. मणिपूरमध्ये झालेल्या हिंसेत परदेशातील दहशतवादी सहभागी असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.

तब्बल दहा वर्षांच्या शांततेनंतर मैतेई आणि कुकी समाजात तेढ वाढली. पूर्वीच्या बहुसंख्य समुदायाला अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करण्याचा विचार सुरू झाला आणि मतभेद वाढले. मैतेई आणि कुकी समाजात तणाव वाढला. दोन समाजांतील जुन्या संघर्षाला जातीय संघर्षाचे वळण लागले. ही परिस्थिती निर्माण व्हावी यासाठी काही जणांनी ठरवून प्रयत्न केल्याचे दिसते. हे का झाले आणि कसे झाले हे जाणून घ्यायचे असेल तर मणिपूरच्या अस्तित्वाबाबत चिंता कोणी व्यक्त केली हे जाणून घ्यावे लागेल, असे सरसंघचालक म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ईशान्य भारतात अनेक वर्षांपासून काम करत आहे आणि पुढेही करत राहील. मणिपूरमध्ये शांतता आणि सौहार्द निर्माण व्हावा यासाठी काम करेल, असेही सरसंघचालक म्हणाले.

यंदाच्या विजयादशमी उत्सवाला प्रसिद्ध गायक – संगीतकार शंकर महादेवन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पण कार्यक्रमाला उपस्थित होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number