ठाण्यात अवजड वाहनांना बंदी!

ठाणे, २४ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: घोडबंदर रोडवरील ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर मेट्रोच्या गर्डेर ४ व ५ चे काम करण्यासाठी सोमवारी (ता.२३) ते रविवारी (ता.२९) या कालावधीत रोज रात्री २३.५५ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना वेदांत हॉस्पिटलजवळ प्रवेश बंद करण्यात आला आहे. घोडबंदर रोडवरून ठाण्याकडे जाणारी वाहने पर्यायी मार्ग म्हणून अवजड वाहने […]

ठाण्यात अवजड वाहनांना बंदी!

ठाणे, २४ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: घोडबंदर रोडवरील ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर मेट्रोच्या गर्डेर ४ व ५ चे काम करण्यासाठी सोमवारी (ता.२३) ते रविवारी (ता.२९) या कालावधीत रोज रात्री २३.५५ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना वेदांत हॉस्पिटलजवळ प्रवेश बंद करण्यात आला आहे.

घोडबंदर रोडवरून ठाण्याकडे जाणारी वाहने पर्यायी मार्ग म्हणून अवजड वाहने पिलर ९ व १० च्या गॅप मधून ठाणे घोडबंदरवरील एक लेनवरून विरुद्ध दिशेने पुढे पिल्लर क्रमांक १९७ व १९६च्या गॅपमधून घोडबंदर ठाणे मार्गस्थ होऊ शकतील. तसेच घोडबंदर व्हँबीवरील पिलर ४ आणि ५ वर यु गर्डर काम करताना अवजड वाहने सोडून इतर वाहने मुख्य रस्त्याने इच्छितस्थळी जातील. यामध्ये पोलिस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन, गॅस वाहने आणि अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना सुट देण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number