मुंबई, २३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : उद्धवच मराठ्यांचे खरे शत्रू या शब्दात भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव यांच्यावर हल्ला चढवला. फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय झाला. पण उद्धव सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात राज्य शासन अपयशी ठरले. फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण उद्धव सरकारच्या काळात गेले. हे आरक्षण टिकवण्यासाठी आवश्यक ती खबरदारी उद्धव सरकारने घेतली असती तर आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती झालीच नसती, असे नितेश राणे म्हणाले. आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. मराठ्यांच्या या आत्महत्यांना उद्धव सरकार कारणीभूत आहे, असेही नितेश राणे म्हणाले.
‘उद्धवच मराठ्यांचे खरे शत्रू’
‘मराठ्यांच्या आत्महत्येला उद्धवच जबाबदार’
नितेश राणेंचा उद्धव यांच्यावर हल्लाबोल