अजित पवारांना बारामतीतच मराठा समाजाचा घेराव

बारामती, २३ ऑक्टोबर २०२३ : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणासाठी वाद- प्रतिवाद रंगताना दिसत आहेत, त्यामुळे आता मराठा समाज आक्रमक होऊ लागला आहे. अशातच आता मनोज जरांगे यांनी पेटवलेली मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची ठिणगी पुन्हा एकदा राज्यभरात वणव्याचे रुप घेत आहे. नुकतीच बारामतीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा युवकांनी घेराव घातला. यावेळी अजित पवारांनी […]

अजित पवारांना बारामतीतच मराठा समाजाचा घेराव

बारामती, २३ ऑक्टोबर २०२३ : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात मराठा आरक्षणासाठी वाद- प्रतिवाद रंगताना दिसत आहेत, त्यामुळे आता मराठा समाज आक्रमक होऊ लागला आहे. अशातच आता मनोज जरांगे यांनी पेटवलेली मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची ठिणगी पुन्हा एकदा राज्यभरात वणव्याचे रुप घेत आहे. नुकतीच बारामतीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा युवकांनी घेराव घातला. यावेळी अजित पवारांनी त्यांना आपली मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका समजवून सांगितली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामतीत सभा होती. या सभेनंतर मराठा समाजाच्या युवकांनी अजित पवारांना घेराव घातला आणि आरक्षणाबाबत तुमची वैयक्तिक भूमिका काय ?असे विचारले. यावर अजित पवार म्हणाले की ,”कोणत्याही समाजाला धक्का न लागता आरक्षण दिले जाईल ही सरकारची भूमिका आहे. याबाबत वेगवेगळ्या घटकांबरोबर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. या बैठकीत मराठा समाजातील १० टक्क्यातील ८ टक्के लोक हे ईडब्लुएसचा लाभ घेतात हे लक्षात आले आहे”.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number