‘…तर समिती का स्थापन केली ?’

मुंबई, १६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : कुणबी प्रमाणपत्राची मागणी जरांगेंची नव्हती तर प्रमाणपत्रांबाबत निर्णय घेण्यासाठी समिती का स्थापन केली, असा प्रश्न मराठा समन्वयक दिलीप पाटील यांनी उपस्थित केला. मराठा समाजातील सर्व नागरिकांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि ओबीसीमधून आरक्षण द्यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. आरक्षण देण्याचा निर्णय घेण्याआधी एक मोठी कायदेशीर प्रक्रिया […]

‘…तर समिती का स्थापन केली ?’

मुंबई, १६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : कुणबी प्रमाणपत्राची मागणी जरांगेंची नव्हती तर प्रमाणपत्रांबाबत निर्णय घेण्यासाठी समिती का स्थापन केली, असा प्रश्न मराठा समन्वयक दिलीप पाटील यांनी उपस्थित केला.

मराठा समाजातील सर्व नागरिकांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे आणि ओबीसीमधून आरक्षण द्यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. आरक्षण देण्याचा निर्णय घेण्याआधी एक मोठी कायदेशीर प्रक्रिया राबवावी लागते. ही प्रक्रिया बिलकूल राबवू नये अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली. पण ही मागणी करून काही दिवस होत नाही तोच कुणबी प्रमाणपत्राची मागणी जरांगेंची नव्हतीच, ही मागणी आमच्यावर लादण्यात आली; असे मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक किशोर चव्हाण म्हणाले. चव्हाण यांच्या या वक्तव्यावर लगेच दिलीप पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला.

जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या लक्षवेधी या कार्यक्रमात ‘जरांगे पाटील यांची मागणी चुकलीय’ या विषयावर चर्चा सुरू होती. या चर्चेत किशोर चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर दिलीप पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number