‘या’ ठिकाणी होणार शिवसेनेचा दसरा मेळावा

मुंबई, १६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा दसरा मेळावा मंगळवार २४ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबईत आझाद मैदान येथे होणार आहे. तर उद्धव गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे होणार आहे. आधी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी शिवसेना आणि उद्धव गट या दोघांनी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला होता. काही दिवसांपूर्वी शिवसेनेने […]

‘या’ ठिकाणी होणार शिवसेनेचा दसरा मेळावा

मुंबई, १६ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा दसरा मेळावा मंगळवार २४ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबईत आझाद मैदान येथे होणार आहे. तर उद्धव गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे होणार आहे. आधी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी शिवसेना आणि उद्धव गट या दोघांनी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला होता. काही दिवसांपूर्वी शिवसेनेने शिवाजी पार्कसाठीचा अर्ज मागे घेतला. यानंतर महापालिकेने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क उद्धव गटाला देत असल्याचे जाहीर केले. आता महापालिकेने शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाजवळचे आझाद मैदान दिल्याचे जाहीर केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number