‘मराठ्यांची विजययात्रा नाहीतर माझी अंत्ययात्रा’

अंतरवाली सराटी, १४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : आता मराठ्यांची विजययात्रा निघेल नाहीतर माझी अंत्ययात्रा निघेल… मराठे एकवटले आहेत… आता माघार नाही…. अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी राज्य शासनाला इशारा दिला. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. ते शनिवारी अंतरवाली सराटी येथील […]

‘मराठ्यांची विजययात्रा नाहीतर माझी अंत्ययात्रा’

अंतरवाली सराटी, १४ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : आता मराठ्यांची विजययात्रा निघेल नाहीतर माझी अंत्ययात्रा निघेल… मराठे एकवटले आहेत… आता माघार नाही…. अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी राज्य शासनाला इशारा दिला. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. ते शनिवारी अंतरवाली सराटी येथील सभेत बोलत होते.

मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या ४५ जणांना शासनाने आश्वासन दिल्याप्रमाणे मदतनिधी आणि शासकीय नोकऱ्या द्याव्या. दर दहा वर्षांनी आरक्षण दिलेल्या ओबीसींचे सर्वेक्षण करून प्रगत जाती बाहेर काढाव्या, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी फक्त दहा दिवस उरले आहेत, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी राज्य शासनाला इशारा दिला. आंदोलनाची पुढील दिशा २२ ऑक्टोबरला जाहीर करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

महत्त्वाचे मुद्दे :

‘मराठ्यांची विजययात्रा नाहीतर माझी अंत्ययात्रा’
‘मराठे एकटवले आता माघार नाही’
मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

‘सरकारच्या हातात फक्त १० दिवस’
मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

‘भुजबळ, सदावर्तेंना मराठ्यांना उकसवायला सांगितलं’
‘मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी भुजबळ, सदावर्तेंना सांगितलं’
मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

‘मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही कटीबद्ध’
जरांगेच्या भाषणानंतर भाजपाकडून फडणवीसांचा व्हिडिओ ट्विट

‘सदावर्ते यांनी मराठ्यांचं वाटोळं केलं’
‘फडणवीसांनी सदावर्ते यांना समज द्यावी’
‘मला अटक करणं सोपं नाही’
जरांगेंच्या निशाण्यावर गुणरत्न सदावर्ते

‘जरांगेंमागे वेगळे राजकीय हात’
‘जरांगेंना कुठल्या प्रकारचा पाठिंबा दिला’
‘शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करावं’
गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर हल्लाबोल

‘माझं काहीतरी योगदान म्हणूनच मला मोठं केलं’
‘समाजासाठी जीव जाणार असेल तर आनंदच’
छगन भुजबळांचा जरांगेंवर पलटवार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number