मुंबई, १३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन दिला. आर्थिक अफरातफर केल्याचा आरोप एकनाथ खडसे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दोन लाखांच्या वैयक्तिक मुचलक्यावर आणि दोन लाखांच्या हमीवर एकनाथ खडसे यांना जामीन देण्यात आला.
काय आहे प्रकरण ?
भोसरी येथील एमआयडीसीच्या भूखंड खरेदीत तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी गैरवापर केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. सुमारे ३१ कोटी रुपयांचा हा भूखंड खडसे यांचे जावई गिरीश चौधरी आणि त्यांच्या पत्नी यांनी अवघ्या ३.७ कोटी रुपयांना विकत घेतल्याचा आरोप होता. त्या प्रकरणी चौधरी यांना दीड वर्षापूर्वी ईडीने अटक केली होती.