‘जरांगेंच्या सभेसाठी पैसा कुणाचा ?’

अंतरवाली सराटी, १३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : आम्ही ऐकतोय जरांगेंच्या सभेसाठी मोठी तयारी सुरू आहे. शंभर एकर जमीन घेतलेली आहे. सात कोटी रुपये जमा देखील झाले आहेत. लाखो लोक तिथे येणार आहेत, त्यांची सोयही केली आहे. सभेतून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मागणार आहेत. एरवी दहा रुपये कुणी खिशातून काढून देत नाही यांनी दहा कोटी रुपये […]

‘जरांगेंच्या सभेसाठी पैसा कुणाचा ?’

अंतरवाली सराटी, १३ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : आम्ही ऐकतोय जरांगेंच्या सभेसाठी मोठी तयारी सुरू आहे. शंभर एकर जमीन घेतलेली आहे. सात कोटी रुपये जमा देखील झाले आहेत. लाखो लोक तिथे येणार आहेत, त्यांची सोयही केली आहे. सभेतून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मागणार आहेत. एरवी दहा रुपये कुणी खिशातून काढून देत नाही यांनी दहा कोटी रुपये जमा केले आहेत. हे पैसे येतात कुठून ?, असा प्रश्न महाराष्ट्र शासनाचे मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.

जालन्यातील अंतरवाली सराटीत जंगी तयारी

मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यभर रान पेटवलेल्या मनोज जरांगे पाटलांनी मराठा संघटनांचा आवाज आणखी बुलंद केला आहे. राज्यातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी जरांगेंनी उपोषणाच्या माध्यमातून आंदोलन छेडले होते. यानंतर सरकारने मार्ग काढण्यासाठी महिन्याचा अवधी मागितला होता. तो १४ ऑक्टोबरला संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर जालन्यातील अंतरवाली सराटी येथे जरांगेंची सभा होणार आहे. सध्या त्या सभेची तब्बल शंभर ते दीडशे एकरांवर जंगी तयारी करण्यात येत आहे. या सभेला लाखोंच्या संख्येने नागरिक येतील असा दावा जरांगे पाटलांचे समर्थक करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number