बुलढाणा, १२ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : बुलढाणा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांना गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व देण्यात आले. पण त्यांना झेड सुरक्षा नाकारण्यात आली. एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांच्या हातून मारण्याचा कट होता असं धक्कादायक विधान आमदार संजय […]
बुलढाणा, १२ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : बुलढाणा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांना गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व देण्यात आले. पण त्यांना झेड सुरक्षा नाकारण्यात आली. एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांच्या हातून मारण्याचा कट होता असं धक्कादायक विधान आमदार संजय गायकवाड यांनी करून एकच खळबळ माजवून दिली आहे.