घाटकोपरच्या गुजराती पाटीवरुन मनसे आक्रमक

मुंबई, १२ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : घाटकोपरमध्ये ‘मारु घाटकोपर’ असे नमूद असलेला गुजराती बॅनर सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आला होता. हा बॅनर हटवण्यात आला. बॅनरवरून आता मराठी विरुद्ध गुजराती असा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. मनसेने घाटकोपरमध्ये ठिकठिकाणी बॅनर लावून ‘मारु घाटकोपर’ नाही, ‘माझे घाटकोपर’ अशी घोषणा दिली आहे. दुसरीकडे घाटकोपरचे नगरसेवक प्रविण छेडा यांनी ‘मारु […]

घाटकोपरच्या गुजराती पाटीवरुन मनसे आक्रमक

मुंबई, १२ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : घाटकोपरमध्ये ‘मारु घाटकोपर’ असे नमूद असलेला गुजराती बॅनर सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आला होता. हा बॅनर हटवण्यात आला. बॅनरवरून आता मराठी विरुद्ध गुजराती असा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे.

मनसेने घाटकोपरमध्ये ठिकठिकाणी बॅनर लावून ‘मारु घाटकोपर’ नाही, ‘माझे घाटकोपर’ अशी घोषणा दिली आहे. दुसरीकडे घाटकोपरचे नगरसेवक प्रविण छेडा यांनी ‘मारु घाटकोपर’चे हटवलेले बॅनर पुन्हा लावून देण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. छेडा यांच्या मागणीचा निषेध करत मनसेने गुजरातीभाषक लोकप्रतिनिधींनी गुजरातमध्ये जाऊन निवडणूक लढवावी, अशीही बॅनरबाजी सुरू केली आहे.

पोलिसांनी तणाव निर्माण होऊ नये म्हणून घाटकोपरमध्ये जिथे ‘मारु घाटकोपर’ हा बॅनर लागला होता त्या भागात बंदोबस्त ठेवला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number