नवी दिल्ली, १२ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : भारताने ब्राह्मोस या सुपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्राच्या दोन दिवसांत चार यशस्वी चाचण्या घेतल्या. लष्कराने दहा ऑक्टोबरला तर हवाई दलाने अकरा ऑक्टोबरला ब्राह्मोस या सुपरसॉनिक क्रुझ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचण्या घेतल्या. युरोपमध्ये रशिया – युक्रेन लढाई सुरू आहे तर मध्य आशियात इस्रायलने दहशतवाद्यांविरोधात गाझा पट्टीत आणि लेबेनॉनमध्ये मोठी कारवाई सुरू केली आहे. या घडामोडी सुरू असताना भारताने ‘ब्राह्मोस’च्या चाचण्या घेतल्या. सर्व चाचण्यांमध्ये ‘ब्राह्मोस’ने नियोजीत लक्ष्य साधले. चाचण्या यशस्वी झाल्या असून लष्कर आणि हवाई दलाने उद्दीष्टे साध्य केली आहेत.