पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार ठार

इस्लामाबाद, ११ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी शाहीद लतीफ याला पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी गोळ्या झाडून ठार केले. भारतात पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर २०१६ मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी शाहीद लतीफ याला अज्ञातांनी सियालकोटमधील एका मशिदीच्या आवारात ठार केले. अतिशय जवळून शाहीद लतीफवर गोळ्या झाडण्यात आल्या. मनमोहन सिंग सरकारच्या […]

पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार ठार

इस्लामाबाद, ११ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी शाहीद लतीफ याला पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी गोळ्या झाडून ठार केले. भारतात पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर २०१६ मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी शाहीद लतीफ याला अज्ञातांनी सियालकोटमधील एका मशिदीच्या आवारात ठार केले. अतिशय जवळून शाहीद लतीफवर गोळ्या झाडण्यात आल्या. मनमोहन सिंग सरकारच्या काळात २०१० मध्ये पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्यासाठी भारताने शाहीद लतीफ आणि इतर २४ दहशतवाद्यांना सोडले होते.

याआधी १९९९ मध्ये इंडियन एअरलाईन्सच्या आयसी ८१४ विमानाचे अपहरण झाले होते. प्रवाशांच्या बदल्यात दहशतवाद्यांनी सुरुवातीला ३२ दहशतवाद्यांच्या सुटकेची मागणी केली होती. या यादीत शाहीद लतीफचे नाव होते. पण वाजपेयी सरकारने ही यादी फेटाळली होती. नंतर १५४ प्रवाशांच्या सुरक्षित सुटकेसाठी वाजपेयी सरकारने मौलाना मसूद अजहर आणि इतर दोन अशा तीन दहशतवाद्यांना सोडले होते.

दहशतवादी मुल्ला बहौर ठार झाल्याचे वृत्त

इराणमधून कुलभूषण जाधव यांचे अपहरण करून त्यांना पाकिस्तानला सोपवणारा दहशतवादी मुल्ला बहौर अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात ठार झाल्याचे वृत्त आहे.

कोण आहेत कुलभूषण जाधव ?

भारतीय नौदलाच्या सेवेतून मुक्त झालेले कुलभूषण जाधव व्यावसायिक कामासाठी इराणला गेले होते. इराणमधून त्यांचे अपहरण करण्यात आले. अपहरण करून त्यांना पाकिस्तानच्या हाती सोपवण्यात आले. यानंतर कुलभूषण जाधव यांच्यावर पाकिस्तानने हेरगिरीचा आरोप ठेवला. पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावली होती. पण भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागून जाधव यांच्या फाशीवर स्थगिती आणली. सध्या कुलभूषण जाधव पाकिस्तानमधील तुरुंगात आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number