मुंबई, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार दसऱ्यानंतर राज्याचा दौरा करणार आहेत. ही माहिती दादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. राज्यातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अजित पवार दौरा करणार आहेत. या दौऱ्यात अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम लवकरच जाहीर करू असे […]
मुंबई, १० ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार दसऱ्यानंतर राज्याचा दौरा करणार आहेत. ही माहिती दादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. राज्यातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अजित पवार दौरा करणार आहेत. या दौऱ्यात अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम लवकरच जाहीर करू असे सुनील तटकरे यांनी सांगितले.